अनुसुचित जमाती‘ च्या अंमलबजावणीसाठी तीव्र लढा! मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांचे मत : अहिल्या संदेश यात्रा समारोप
कोल्हापूर प्रतिनिधी
धनगर समाजासाठी ‘अनुसुचित जमाती’च्या अंमलबजावणीसाठी राज्यकर्ते वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे. आता आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी धनगर महासंघ प्रणित मल्हार सेना राज्यभर तीव्र लढा उभारेल, असा इशारा मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिला.
जिल्ह्यात काढलेल्या ‘अहिल्या संदेश यात्रे‘च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान धनगर समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा धुळे येथे 29 रोजी होणाऱ्या समाजाच्या मेळाव्यात ठरवण्यात येणार असल्याचेही रानगे यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर ‘अहिल्या संदेश यात्रा’ काढण्यात आली. णल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 65 दिवस काढलेल्या या यात्रेचा राजर्षी शाहू समाधी स्थळी समारोप करण्यात आला. धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठीच ‘अहिल्या संदेश यात्रा‘ काढल्याचे सांगितले. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक व शाहाजी सिद् यांनी मनोगत व्यक्त केले. छगन नांगरे व लिंबाजी हजारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब दाईगडे, रामचंद्र रेवडे, सोमाजी वाघमोडे, मायाप्पा पुजारी, दीपक ठोंबरे, बंडोपंत बरगाले, बाबुराव बोडके, संपत रूपने, मारुती अनुसे, लक्ष्मण गोरडे, बाबुराव कोळेकर उपस्थित होते.