कोल्हापूरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन! राज्यभरातील एसटी सेवेवर परिणाम
राज्य शासानाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह अन्य मागण्यासाठी एस. टी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. कोल्हापूरामध्ये विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. एस.टी. कर्मचाऱ्यांना शासानाप्रमाने वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता फरक मिळावे, वार्षिक वेतन वाढीचा फरक मिळावे, चुकीच्या वेतनश्रेणीमधील तफावत दूर करुन सरसकट एकसारखी वेतनश्रेणी करावी यासह अन्य मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले.
मागील महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात उच्च स्तरीय समितीला आठ दिवसांत अहवाल देऊन 20 ऑगस्टला कृती समितीसोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. परंतू ही बैठक झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर विभागांतर्गत विभागीय कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे उत्तम पाटील, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे संजीव चिकुर्डेकर, सुनिल घोरपडे, महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेचे नामदेव रोडे, संदीप घाडगे इंटक संघटनेचे विजय बर्गे, विवेक कांबळे कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे दादू गोसावी, संजय कदम, दीपाली येलबेली, तन्वीर मुजावर, सुभाष सुतार, विनायक भोगम, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांचा आंदोलनाला पाठींबा
आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली. आंदोलनाला पाठींबा असल्याचेही सांगितले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी मगोगतही व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यासोबत आज बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आज, बुधवारी सायंकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे. तरी सणाचे दिवस असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी कृती करू नये, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
ऐन गणेशोत्सवात होणार प्रवाशांची गैरसोय
कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत तोडगा निघाला नाही आणि आंदोलन असेच सुरू राहिले तर ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मुंबईहून कोकणात गणेशोत्सवानिमित्त हजारो नागरिक एसटीने जातात. आज, बुधवारसाठी 5 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण आहे.
एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्याबाबत 13 संघटनेच्या कृती समितीने वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने सकारात्मक मार्गकाढून एस.टी. कर्मचारी याना न्याय यावा.
संजीव चिकुर्डेकर, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी कर्मचारी काँग्रेस