कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एसटी बसची कारला मागून जोराची धडक

04:40 PM Oct 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महामार्गावर पिंगुळी येथील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही

Advertisement

कुडाळ

Advertisement

मुंबई - गोवा महामार्गावर पिंगुळी - धुरीटेंबनगर येथील साई मंदिर समोर पणजी - पुणे एसटी बसने एका खासगी कारला मागून जोराची धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.या धडकेने सदर कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जात पलटी झाली.कार मध्ये चालक व चार महिला होत्या. सुदैवाने कार व बसमधील कुणालाही दुखापत झाली नाही.या दरम्यान, कुडाळच्या दिशेने जाणारा एक मोटरसायकलस्वार सुदैवाने बचावला.शिवाजीनगर - कोल्हापूर आगाराची पणजी - पुणे बस सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती. महामार्गावर पिंगुळी - धुरीटेंबनगर येथील साई मंदिर समोर बांदा येथून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला मागून या बसने जोराची धडक दिली.यात कार रस्त्याच्या डाव्या बाजूला साधारण 40 फूट अंतरावर जात पलटी झाली. कारमध्ये चालक व चार महिला होत्या. कारचालकाला किरकोळ दुखापत झाली. बस मधील कुणालाही दुखापत झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी येथे धाव घेत सहकार्य केले.कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच कुडाळ आगाराचे अधिकारी - कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यात कारचे मोठे नुकसान झाले. बसच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूचेही नुकसान झाले. कारला धडक दिल्यानंतर कुडाळच्या दिशेने एका मोटारसायकल त्या कारला आदळणार होती.परंतु मोटारसायकलस्वाराच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# accident# pinguli # bus accident #
Next Article