For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सवलतीसाठी 'एनसीएमसी'ची सक्ती तात्पुरती शिथिल; प्रवासी-वाहकांमध्ये उडणारे खटके टाळण्यासाठी एसटी महामंडळाचे पाऊल

02:30 PM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सवलतीसाठी  एनसीएमसी ची सक्ती तात्पुरती शिथिल  प्रवासी वाहकांमध्ये उडणारे खटके टाळण्यासाठी एसटी महामंडळाचे पाऊल
Advertisement

कोल्हापूर: एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे. एसटीच्या सवलतींसाठी 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात दररोज उडणारे खटके टाळण्यासाठी एसटी महामंडळाने या सवलतीच्या अंमलबजावणीत तात्पुरती शिथिलता दिली आहे. यामुळे आता 15 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना जुन्याच पद्धतीने सवलत घेता येणार आहे.

Advertisement

15 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच (जुन्या कागदपत्रांच्या आधारे) प्रवासभाड्यात सवलत मिळणार आहे. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान ज्या प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी अर्ज केला आहे, त्यांना 'कार्ड काढल्याची पावती' वाहकाला दाखविल्यास सवलत दिली जाईल. 1 ऑक्टोबरपासून सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य राहील. यामुळे एसटीने सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर सर्वच घटकांनी 1 ऑक्टोबरपूर्वी एनसीएमसी कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement

.