Sangli News : विजापूर-सातारा मार्गावर एसटी बस आणि टँकरची धडक; 15 जखमी
कर्नाटक डेपो एसटी बस आणि टँकरची समोरासमोर धडक
कवठेमहांकाळ : घाटनांद्रे नजीक विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर विजापूर-सातारा ही साताऱ्याकडून निघालेली कर्नाटक डेपोची एसटी बस (क्रमांक इ-०५५९) व टैंकर (क्रमांक ०२ ६९७१) यांची समोरासमोर धडक होऊन १५ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमीना उपचारासाठी भिवघाट (ता खानापूर) येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील जखमी मध्ये संगिता उत्तम पवार (वय-४९ रा वडे-सातारा), कावेरी अमित वाघमारे (वय-५ रा ढवळा ता सांगोला), रमजान ओलेकर (वय-६० रा इंडी कर्नाटक), आलिया बागवान (वय-१३ रा कराड), साकीर बागवान (वय-४० कराड) दुर्गा प्रसाद प्रधान (वय-३० रा झारखंड), देवकी कोळी (वय-७वर्ष), शंकर होदमणी (वय-२७ रा नळईकी), महेश माळी (वय-१८ या सिध्दनाथ), इंडोकराई (वय-२३ या झारखंड), चालू गजराई (वय-४० रा झारखंड), मल्लाप्पा कोळी (वय-६० रा नळोगी), रक्षीता आकाश कांबळे(वय-२५ रा विजापूर.), तरवी आकाश कांबळे (वय-२ या विजापूर), निर्मला मुकेश कांबळे (वय-५५ रा विजापूर) यांचा समावेश आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून, ते पुढील तपास करीत आहेत.