For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले भटवाडी येथे एसटी व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक

04:05 PM Jul 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले भटवाडी येथे एसटी व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)

Advertisement

वेंगुर्ले आगाराच्या सकाळी 8 वाजता सुटलेल्या वेंगुर्ले कुडाळ कणकवली मार्गे स्वारगेट वल्लभ एम.एच.-13- सीयु -7845 ही पुण्यात जाणारी एसटी बस व वेंगुर्लेत येणारा आयशर टेम्पो एम.एच.-34- बी. झेड.- 6952 यांची सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील कांही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर दोन प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या सर्व दुखापती झालेल्या प्रवाशांना वेंगुर्लेतील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले. किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सोडवण्यात आले तर गंभीर दुखापती झालेल्या दोन प्रवाशांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच वेंगुर्ले आगाराचे अधिकारी व वेंगुर्ले पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. यासंबंधी पुढील कारवाई वेंगुर्ला पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.