For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Akkalkot News | अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर एसटी आणि डंपरची भीषण धडक; २ प्रवाशांचा जागीच मृत्यू

03:13 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
akkalkot news   अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर एसटी आणि डंपरची भीषण धडक  २ प्रवाशांचा जागीच मृत्यू
Advertisement

                 गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर समोरासमोर धडक

Advertisement

अक्कलकोट -गाणगापूरकडून अक्कलकोटकडे येणाऱ्या एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एसटीतील २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १० प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर लागलेल्या आगीत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच एसटी बसचेही प्रचंड नुकसान झाले. हा अपघात अक्कलकोट - गाणगापूर रस्त्यावर रूद्देवाडी बस स्टॉपजवळ सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

चंद्रभागा लाडप्पा डडपड (वय १८, रा. चिकहळ्ळी ता. अक्कलकोट), चांगदेव श्रीरंग लवटे (वय ७६, रा. डुकुरवाडी भूम, जिल्हा धाराशिव) अक्कलकोट रुद्देवाडी येथे झालेल्या अपघातानंतर डंपरने पेट घेतला. दुसऱ्या छायाचित्रात जखमींवर उपचार करताना डॉक्टर.अशी मृतांची नावे आहेत.याप्रकरणी बसचालक जोतीराम दिलीप चव्हाण (वय ३९) यांनी फिर्याद दिली.

Advertisement

आरोपी डंपर चालक अजयकुमार अर्जुन यादवरा (पद्माजि. पलामू, राज्य झारखंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.गाणगापूरकडून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसचा (क्रमांक एम. एच. १३ सीयू ८३३) ला टिपर (क्रमांकएम. एच. ०७ एजे ३९०६) ने समोरून जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की बसमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले. तर एका वृद्धाचा बसमध्येचगंभीर जखमी होऊन जागेवर मृत्यू झाला. त्यानंतर धडक दिलेला डंपर काही अंतरावर जाऊन उलटला व त्या डंपरला आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी बसमधील तातडीने जखमींना बाहेर काढले.

अपघातात बसमधील प्रवासी अमिन इब्राहिम वतीयाळ (वय ५०, रा. माशाळ) यांच्या चेहऱ्यांमध्ये काचा घुसल्याने त्यांना सोलापूरला पाठविण्यात आले. जखमी रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक माने करीत आहेत.

Advertisement
Tags :

.