For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावीचा निकाल उद्या

03:17 PM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहावीचा निकाल उद्या
Advertisement

एकूण 20659 विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार

Advertisement

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 या महिन्यात घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या रविवार दि. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. जाहीर करण्यात येणार आहे. या निकालातून परीक्षा दिलेल्या 20,659 परीक्षार्थींचे भवितव्य उघड होणार आहे. दि. 13 मार्च ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत दहावीची परीक्षा 32 केंद्रांतून घेण्यात आली होती. त्यासाठी 10819 मुलांनी तर 9840 मुलींनी नोंदणी केली होती. त्यांचा परीक्षेचा निकाल उद्या समोर येणार आहे. संपूर्ण निकाल गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांनी http://www.gbshse.in या वेबसाईटला भेट देऊन निकाल पहावा आणि गरजेप्रमाणे डाऊनलोड करुन घ्यावा, असे बोर्डाने कळवले आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल 95 टक्के लागला होता. शाळांमधून गुणपत्रिका वितरणाची तारीख लवकरच बोर्डातर्फे जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी शाळांनी अधिकृत प्रतिनिधी गोवा बोर्डाच्या पर्वरी कार्यालयातील आयटी विभागात पाठवावा, असे बोर्डातर्फे सूचित करण्यात आले आहे. मागील वर्षी एकूण 18837 परीक्षार्थी होते. यंदा त्यात वाढ झाली असून त्यांची संख्या 20 हजारपेक्षा पुढे गेली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.