श्रीराम, रेयस-व्हॅरेला विजयी
वृत्तसंस्था / ऑकलंड
एटीपी टूरवरील येथे होणाऱ्या ऑकलंड एएसबी क्लासीक पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी भारताच्या सुमित नागलचे आव्हान लवकरच समाप्त झाले. दरम्यान अॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि रेयस-व्हॅरेला यांनी पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
अॅडलेड टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या एन. श्रीराम बालाजी व त्याचा मेक्सिकन साथीदार रेयस-व्हॅरेला यांनी रोहन बोपन्ना आणि कोलंबियाचा बॅरीनटोस यांचा 4-6, 6-2, 10-7 असा पराभव केला. सदर स्पर्धा 250 दर्जाची आहे.
ऑकलंड एएसबी क्लासीक पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान अमेरिकेच्या अॅलेक्स मिचेलसनने संपुष्टात आणले. जवळपास अडीच तास चालेल्या एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या मिचेलसनने नागलचा 6-7 (6-8), 6-4, 2-6 असा पराभव केला.