कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीनगरमध्ये हंगामातील सर्वात थंड दिवसाची नोंद

06:26 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 पारा -3.2 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच काश्मीर खोऱ्यात तीव्र थंडी जाणवत आहे. पारा गोठणबिंदूपेक्षा अनेक अंशांनी खाली गेला आहे. शोपियानमध्ये किमान तापमान उणे 5.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, तर श्रीनगरमध्ये रविवारी रात्री उणे 3.2 अंश सेल्सिअस इतके हंगामातील सर्वात थंड तापमान नोंदवले गेले. हे तापमान आतापर्यंतच्या सर्वात थंड रात्रींपैकी एक आहे. पहलगाममध्ये -4.0 अंश सेल्सिअस तापमान आणि गुलमर्गमध्ये -1.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दक्षिण काश्मीरमध्येही थंडीची लाट तीव्र झाली आहे. पुलवामामध्ये तापमान -5.0 अंश सेल्सिअस आणि शोपियानमध्ये -5.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे ते या प्रदेशातील सर्वात थंड भागात समाविष्ट झाले आहे. झोजिला सारख्या उंच भागातही पारा बराच घसरला आहे. उत्तर आणि मध्य काश्मीरमधील तापमानदेखील गोठणबिंदूच्या खाली राहिले. कुपवाडामध्ये -3.2 अंश सेल्सिअस, बडगाममध्ये -3.4 अंश सेल्सिअस आणि बारामुल्लामध्ये -4.6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण झाल्याची नोंद झाली आहे.

लेह-लडाखमध्येही कडाक्याची थंडी

लडाखमध्येही अत्यंत थंडीची स्थिती कायम आहे. लेहमध्ये -8.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर कारगिलमध्ये त्यापेक्षाही किंचित घसरण होत तापमान -8.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतातील सर्वात थंड वस्ती असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाणारे द्रास येथे -10.3 अंश सेल्सिअसची नोंद झाली. येत्या काही दिवसांत काश्मीरमध्ये रात्रीचे तापमान शून्यापेक्षा खाली येण्याची शक्यता आहे. 2 आणि 3 डिसेंबर रोजी अंशत: ढगाळ आकाशाचा अंदाजही विभागाने वर्तवल्यामुळे रात्रीचे तापमान किंचित वाढू शकते, परंतु एकूणच थंडीच्या परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल होणार नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article