सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार श्रीलीला
राज शांडिल्य यांच्या चित्रपटात वर्णी
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या कार्तिक आर्यनसोबत एका हिंदी चित्रपटात काम करत आहे. बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणावरून मोठी उत्सुकता दिसून येत आहे. याचदरम्यान श्रीलीला आता एका दिग्गज अभिनेत्यासोबत दिसून येणार आहे.
दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. श्रीलीलाने गुंटूर कारम चित्रपटातील गीत ‘कुर्ची मडथापेट्टी’ आणि पुष्पा 2 : द रुलमधील ‘किस्सिकी’द्वारे देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
श्रीलीला आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. राज शांडिल्य यांना ड्रीमगर्ल या हिट चित्रपटासाठी ओळखले जाते. शांडिल्य यांच्या नव्या चित्रपटात कॉमेडी आणि इमोशनल टचची जादू दिसून येणार आहे. श्रीलीलाची लोकप्रियता दक्षिणेसह आता पूर्ण देशात निर्माण झाली आहे. तिच्या नृत्यकौशल्यामुळे ती कोट्यावधी लोकांची मने जिंकून घेत आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिची जोडी जमल्यास दोघांच्याही चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणी ठरणार आहे.