कार्तिक आर्यनच्या चित्रपटात श्रीलीला
तू मेरी मैं तेरी तू मेरा चित्रपटात वर्णी
‘पुष्पा 2’ या चित्रपटातील एका गाण्याने देशभरात प्रसिद्धी मिळविलेल्या अभिनेत्रीला आता करण जौहरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. भूल भुलैयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागानंतर कार्तिक आर्यनची फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत आहे. अभिनेत्याकडे धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ आहे. यात तो मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर नायिका म्हणून यात श्ा़dरीलीला झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी करण जौहरकडून श्रीलीलाशी संपर्क साधण्यात आला आहे. तिनेही या चित्रपटात सहभागी होण्यासाठी रुची दाखविली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
कार्तिकने ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाची घोषणा करत याचा टीझरही सादर केला होता. कार्तिकचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समीर विद्वान यांनी हाती घेतली आहे. यापूर्वी त्यांनी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.श्रीलीलाने किसिक गीताद्वारे चाहतावर्ग निर्माण केला आहे. 2017 मध्ये श्रीलीलाने चित्रांगदा चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.