नव्या चित्रपटातील श्रीलीलाचा लुक सादर
श्रीलीला लवकरच एका चित्रपटात एजंट मिर्चीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासाब्sात बॉबी देओल दिसून येणार आहे, त्याचेही पोस्टर सादर करण्यात आले आहे. या चित्रपटातील श्रीलीलाच्या लुकला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
चित्रपटाविषयी अधिक माहिती देण्यात आली नसली तरीही हा अॅक्शनने भरपूर मजेशीर चित्रपट असेल, असे पोस्टरमधून स्पष्ट होते. रेडी, स्टेडी, फायर... मिर्ची लागणार आहे, 19 ऑक्टोबर’ अशी पॅप्शन श्रीलीलाने पोस्टरला दिली आहे. श्रीलीलाच्या लुकपूर्वी या चित्रपटातील बॉबी देओलचे पोस्टर जारी करण्यात आले होते. बॉबी यात काळा चष्मा आणि लांब केसांच्या नव्या शैलीत दिसून आला आहे. श्रीलीला आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहेत. यात ‘मास जथारा’ चित्रपट सामील असून यात ती रवि तेजासोबत झळकेल. हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पवन कल्याणसोबत ती एका चित्रपटात काम करत आहे. तर अनुराग बासू यांच्या एका चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसून येणार आहे.