For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार श्रीलीला

06:56 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार श्रीलीला
Advertisement

इब्राहिमसोबत पडद्यावर करणार रोमान्स

Advertisement

श्रीलीला ही दक्षिणेतील उदयोन्मुख अभिनेत्री आहे. आता मुख्य नायिका म्हणूनही तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. श्रीलीलाने टॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. याचदरम्यान आता ती बॉलिवूडमध्येही झळकणार आहे.

श्रीलीला ही सैफ अली खानचा पुत्र इब्राहिमसोबत ‘दिलेर’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करणार आहे. दिलेर चित्रपटच्या निर्मात्यांनी श्रीलीलासोबत चर्चा चालविली आहे.

Advertisement

दिलेर हा कदाचित श्रीलीलाचा पहिला हिंदी चित्रपट असू शकतो. तिने इब्राहिमसोबत काम करण्यास सहमती दर्शविल्याचे समजते. हा चित्रपट एक रोमँटिक-ड्रामा धाटणीचा असेल, याचे चित्रिकरण ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.

दिलेर या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सकडून केली जात आहे. दिलेर हा इब्राहिमचा दुसरा चित्रपट ठरणार आहे. इब्राहिम हा सरजमीन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यासारखे दिग्गज कलाकार सामील आहेत.

Advertisement
Tags :

.