New Ambassador of Qatar | के. श्रीकर रेड्डी कतारमधील भारताचे नवे राजदूत
09:23 PM Jul 25, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
नवी दिल्ली : ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी के. श्रीकर रेड्डी यांची कतारमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 2001 च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असलेले रेड्डी सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे भारताचे महावाणिज्यदूत म्हणून कार्यरत आहेत.
Advertisement
ते लवकरच दोहा येथे आपल्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील. रेड्डी हे कतारमधील सध्याचे भारतीय राजदूत विपुल यांची जागा घेतील.
Advertisement
Advertisement