For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

09:56 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
Advertisement

धामणे : राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धेश्वर देवाच्या यात्रोत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त सुरुवात झाली. येथील देवस्थान पंचकमिटीच्यावतीने मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 6 वाजता अभिषेक घालण्यात येवून सिद्धेश्वर देवाचे विधीवत पूजन करण्यात आले. मंदिराचे पुजारी ह.भ.प. शिवानंद मठपती यांच्या सानिध्यात करण्यात आलेल्या पुजनप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत व सर्व सदस्य आणि राजहंसगड गावातील व पंचक्रोशीतील भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले. दुपारी तीन वाजता गावातील सर्व भाविक आणि देवस्थान पंचकमिटी आपापल्या बैलजोडी सजवून सवाद्य मिरवणूक राजहंसगडावर येवून श्री  मंदिरभोवती प्रदक्षिणा घालण्यात आले. त्यानंतर देवाचे विधीवत पूजन करून मंदिरासमोर नारळ उडविण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 6 वा. गडावरील मंदिरातील पालखी भव्य मिरवणुकीने गावात आणण्यात आली. रात्रभर गावातील पालखीची मिरवणूक वाजतगाजत फिरविण्यात येवून गावातील सिद्धेश्वर मंदिर आवारात मिरवणुकीची सांगता झाली.

Advertisement

आज सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता

बुधवारी सकाळी सजविलेल्या बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक निघून सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवाला यंदा पंचक्रोषीतील भाविकांना मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त गडावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, हणमंत नागवेकर, बसवंत पवार, गुरुदास लोखंडे, गंगाधर पवार, बसवंत चव्हाण, पी.जी. पवार, शंकर लोखंडे, सुरेश थोरवत, बसवंत लोखंडे, गणपत जाधव, बुधाजी इंगळे आदिंनी बरेच परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.