For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेचा 549 धावांचा डोंगर उदारा 188, कमिंदू मेंडीस 84, दिनुशा 92

06:52 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंकेचा 549 धावांचा डोंगर उदारा 188  कमिंदू मेंडीस 84  दिनुशा 92
Advertisement

वृत्तसंस्था, नॉर्थ साऊंड

Advertisement

येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी लंकेने आपला पहिला डाव 9 बाद 549 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने दिवस अखेर पहिल्या डावात 1 बाद 58 धावा जमविल्या होत्या.

आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून यजमान विंडीजने पहिल्या कसोटीत लंकेचा एक डाव आणि 217 धावांनी दणदणीत पराभव करुन आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत लंकेने 5 बाद 338 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उदारा आणि कमिंदू मेंडीस यांनी विक्रमी 215 धावांची द्विशतकी भागिदारी केली. उदाराने 188 तर कमिंदू मेंडीसने 84 धावा जमविल्या.

Advertisement

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर विंडीजने दुसरा नवा चेंडू घेतला. तत्पूर्वी पहिल्या दिवसाअखेर शेवटच्या तासभराच्या कालावधीत विंडीजने लंकेचे 2 गडी बाद केले होते. मात्र दिनुशा आणि कमिंदू मेंडीस या जोडीने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात तसेच त्यानंतर दुसऱ्या सत्रातील बराच कालावधी खेळून काढला. विंडीजच्या फिलिपने मेंडीसला त्रिफळाचीत केले. लंकेची स्थिती यावेळी 6 बाद 476 अशी होती. त्यानंतर दिनूशा हॉजच्या गोलंदाजीवर किंगकरवी झेलबाद झाला. दिनूशाचे शतक 8 धावांनी हुकले. प्रभात जयसूर्याने नाबाद 17 तर मिलान रत्नायकेने 15 आणि इसिता विजेसुंदराने 14 धावा जमविल्या. श्रीलंकेतर्फे सातव्या, आठव्या आणि नवव्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी झाल्याने लंकेने आपला पहिला डाव 9 बाद 549 धावांवर घोषित केला.

संक्षिप्त धावफलक - लंका प. डाव 9 बाद 549 डाव घोषित (उदारा 188, कमिंदू मेंडीस 84, दिनूशा 92), विंडीज प. डाव 24 षटकात 1 बाद 58 (किंग 13, कॅम्पबेल नाबाद 31, हॉज नाबाद 6).

Advertisement
Tags :

.