For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन महिला संघाचा पाकवर मालिका विजय

06:20 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंकन महिला संघाचा पाकवर मालिका विजय
Advertisement

आएशा झफर सामनावीर, इमिशा दुलानी मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था, डंबुला

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान लंकेने पाक महिला संघाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. मात्र या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात पाकने लंकेचा 10 चेंडू बाकी ठेवून चार गड्यांनी पराभव केला. पाकच्या आयेशा झफरला ‘सामनावीर’ तर लंकेच्या इमिशा दुलानीला ‘मालिकावीर’ म्हणून निवडण्यात आले.

Advertisement

या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकन संघाने 20 षटकांत 6 बाद 113 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 18.2 षटकांत 6 बाद 115 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला.

लंकेच्या डावामध्ये कर्णधार अटापटूने 33 चेंडूत 5 चौकारांसह 34, संजना काविंदीने 18 चेंडूत 2 चौकारांसह 20, इमिशा दुलानीने 17 चेंडूत 2 चौकारांसह 17, कविशा दिलहारीने 1 चौकारासह 12 तर नुत्यांगनाने नाबाद 12 आणि काव्या काविंदीने नाबाद 10 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोमिना रिसातने 18 धावांत 2 तर हनी, नशरा संधू, तुबा हसन व आएशा झफर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये आएशा झफरने 31 चेंडूत 10 चौकारांसह 39 तर झुल्फीकारने 12 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21, कर्णधार मुनीबा अलीने 16 चेंडूत 4 चौकारांसह 19, सायरा जबीनने 16 चेंडूत नाबाद 12, हनीने 1 चौकारांसह 8, फातिमाने 1 चौकारांसह 5, जबीनने 16 चेंडूत नाबाद 12 आणि तुबा हसनने 1 चौकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. पाकच्या डावात 1 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 44 धावा जमविताना 2 गडी गमविले. पाकने 94 चेंडूत शतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकांत 6 बाद 113 (अटापटू 34, संजना काविंदी 20, कविशा दिलहारी 12, इमिशा दुलानी 17, कौशिनी नुत्यांगना नाबाद 12, काव्या काविंदी नाबाद 10, अवांतर 5, मोमिना रिसात 2-18, हनी, नशरा संधू, तुबा हसन, आएशा झफर प्रत्येकी 1 बळी). पाक 18.2 षटकांत 6 बाद 115 (मुनीबा अली 19, शेवाल झुल्फीकार 21, आएशा झफर 39, सायरा जबीन नाबाद 12, तुबा हसन नाबाद 6, चमारी अटापटू 2-20, कविशा दिलहारी 2-24, निमाशा मीपगे 1-19)

Advertisement
Tags :

.