For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन महिला संघाचा भारतावर विजय

06:45 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
लंकन महिला संघाचा भारतावर विजय
Advertisement

तिरंगी वनडे मालिका : निलाक्षिका सिल्व्हा सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

येथे सुरु असलेल्या महिलांच्या तिरंगी वनडे मालिकेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अष्टपैलू आणि सामनावीर निलाक्षिका सिल्व्हाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान लंकेने भारताचा 5 चेंडू बाकी ठेऊन 3 गड्यांनी पराभव केला. लंकन महिला संघाचा तब्बल 7 वर्षांनंतर भारतावर हा पहिला विजय आहे.

Advertisement

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकात 9 बाद 275 धावा जमवित लंकेला 276 धावांचे आव्हान दिले. लंकेने 49.1 षटकात 7 बाद 278 धावा जमवित सामना जिंकला.

भारताच्या डावामध्ये रिचा घोषने 48 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 58, सलामीच्या प्रतिका रावलने 39 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35, स्मृती मानधनाने 3 चौकारांसह 18, देओलने 35 चेंडूत 4 चौकारांसह 29, कर्णधार हरमनप्रित कौरने 46 चेंडूत 3 चौकारांसह 37, दिप्ती शर्माने 1 चौकारासह 24, के. गौतमने 3 चौकारांसह 17 आणि स्नेहराणाने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. भारताच्या डावात 4 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी गमाविला. उपकर्णधार स्मृती मानधनाचा हा 100 वा वनडे सामना होता. लंकेतर्फे सुगंधिका कुमारी आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी 3 तर विहांगा आणि इनोका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षिका सिल्व्हा यांनी अर्धशतके झळकाविली. सिल्व्हाने 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 56 तर समरविक्रमाने 61 चेंडूत 5 चौकारांसह 53, गुणरत्नेने 1 चौकारासह 33, हसिनी परेराने 2 चौकारांसह 22, कर्णधार अट्टापट्टूने 3 चौकारांसह 23, कविशा दिलहारीने 5 चौकारांसह 35 तर संजिवनीने 28 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 23 आणि सुगंधिका कुमारीने 20 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 29 धावा जमविल्या. संजिवनी आणि सुगंधिका कुमारी यांनी आठव्या गड्यासाठी अभेद्य 40 धावांची भागिदारी करुन आपल्या संघाला 5 चेंडू बाकी ठेऊन विजय मिळवून दिला. लंकेच्या डावात 3 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 42 धावा जमविताना 1 गडी गमाविला. सिल्व्हाने आपले अर्धशतक 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 28 चेंडूत तर समरविक्रमाने 57 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. भारतातर्फे स्नेह राणाने 45 धावांत 3 तर अरुंधती रे•ाr, प्रतिका रावल आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ बाद होण्याच्या मार्गावर आहे. या स्पर्धेत लंका आणि भारत यांच्यात अंतिम लढत होईल असा अंदाज आहे.

संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात 9 बाद 275 (रिचा घोष 58, रावल 35, मानधना 18, देओल 29, हरमनप्रित कौर 30, रॉड्रिग्ज 37, दिप्ती शर्मा 24, के. गौतम 17, सुगंधिका कुमारी 3-44, अट्टापट्टू 3-43, विहांगा आणि इनोका प्रत्येकी 1 बळी), लंका 49.1 षटकात 7 बाद 278 (हसिनी परेरा 22, गुणरत्ने 33, समरविक्रमा 53, अट्टापट्टू 23, दिलहारी 35, निलाक्षिका सिल्व्हा 56, संजिवनी नाबाद 13, सुगंधिका कुमारी नाबाद 19, स्नेह राणा 3-45, रे•ाr, रावल, श्रीचरणी प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.