लंकन संघाची घोषणा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यांचा लंकन क्रिकेट संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. ही मालिका पाकिस्तानमध्ये खेळविली जाणार आहे. कुशल मेंडीसकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
या मालिकेतील पहिला सामना 9 ऑक्टोबरला, दुसरा सामना 11 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 13 ऑक्टोबरला खेळविला जाईल. या मालिकेतील सर्व सामने रावळपिंडीत होतील. या मालिकेसाठी लंकन संघामध्ये मिशारा, जयवर्धने, उदारा, अराच्चिगे, कमिंदू मेंडीस, शनाका आणि विक्रमसिंगे यांच्या समावेशामुळे फलंदाजीची बाजू अधिक भक्कम झाली आहे. अलिकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये कर्णधार कमिंदू मेंडीसची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली होती. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याने 3 सामन्यात 198 धावा जमविल्या होत्या. चमिरा फर्नांडो, तुषारा आणि मलिंगा हे वेगवान गोलंदाज असून तीक्ष्णा आणि वैश्यकांत हे फिरकी गोलंदाज आहेत. या मालिकेनंतर लंकन संघ तिरंगी वनडे मालिकेत सहभागी होणार आहे. या मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ आहे. या तिरंगी मालिकेनंतर लंकन संघ पाकबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिके खेळणार आहे.
लंकन टी-20 संघ - कुशल मेंडीस (कर्णधार), के. मिशारा, जयवर्धने, उदारा, अराच्चिगे, कमिंदू मेंडीस, शनाका, विक्रमसिंगे, वेलालगे, महेश तीक्ष्णा, वैश्यकांत, चमिरा, बिनुरा फर्नांडो, तुषारा, मलिंगा,