For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकच्या मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा

06:53 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकच्या मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

लंकेमध्ये होणाऱ्या पाकविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी यजमान लंकन संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या मालिकेतील सर्व सामने डंबुलामध्ये खेळविले जातील. 7, 9, 11 जानेवारीला हे सामने होतील.

भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी ही मालिका लंकेच्या दृष्टिकोनातून सरावासाठी महत्त्वाची राहील. मात्र टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पाकविरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी लंकन संघाचे नेतृत्व दासुन शनाकाकडे सोपविण्यात आले आहे. उभय संघामध्ये यापूर्वी रावळपिंडीत झालेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात लंका आणि पाक यांच्यात गाठ पडली होती आणि पाकने लंकेचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते.

Advertisement

लंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), पी. निशांका, कमिल मिशारा, कुशल मेंडीस, कुशल परेरा, धनंजय डिसिल्वा, चरीथ असालेंका, लियानगे, कमिंदु मेंडीस, हसरंगा, वेलालगे, महेश थीक्षाना, टी. मॅथ्यु, डी. चमिरा, महेश पथीराणा, नुवान तुषारा आणि इशान मलिंगा.

Advertisement
Tags :

.