श्रीलंका-वेस्ट इंडीज दौऱ्याची घोषणा
► वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या सहा सामन्यांच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. ज्याचे सामने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहेत. दोन क्रिकेटमधील हे बलाढ्या महिला संघ 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळतील. त्यानंतर तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. ज्यातील पहिला सामना 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा दौरा 3 मार्च रोजी, तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याने संपेल. हे सर्व सहाही सामने ग्रेनेडा येथील ग्रेनेडा नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील. विशेषत: टी-20 आंतरराष्ट्रील मालिका महत्त्वाची असेल. कारण दोन्ही महिला संघ या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी आपली तयारी करत आहेत.
महिलांच्या क्रमवारीत श्रीलंका सध्या सहाव्या क्रमांकासाठी आहे तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत वेस्ट इंडिज सहाव्या तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. श्रीलंका 2024 च्या आशिया चषक विजयानंतर आपली पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. वेस्ट इंडिजने मायदेशात बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकल्या आहेत.
दौऱ्याचे वेळापत्रक
वनडे सामने
20 फेब्रुवारी-ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम
22 फेब्रुवारी-ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम
25 फेब्रुवारी-ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम
टी-20 मालिका
28 फेब्रुवारी : ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम
1 मार्च-ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम
3 मार्च-ग्रेनेडा नॅशनल स्टेडियम