महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंकेचा आज बांगलादेशशी सामना

06:21 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील डलासमध्ये होणाऱ्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश एकमेकांशी भिडणार असून ‘सुपर एट’मध्ये पोहोचण्याच्या आपल्या संधी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. गट ‘ड’ किंवा ’ग्रुप ऑफ डेथ’मध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेशचा समावेश आहे. त्याखेरीज नेदरलँड्स व नेपाळ असून त्यापैकी नेदरलँड्स धक्कादायक विजय नोंदविण्यास सक्षम आहेत. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात विजय मिळविले जातात हे गट टप्प्याच्या शेवटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

Advertisement

श्रीलंकेला त्यांच्या सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दाऊण पराभवातून आज पुनरागमन करावे लागेल. त्यांच्या फलंदाजांकडून अधिक चांगले फटके खेळले जाण्याची अपेक्षा केली जाईल. दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 77 धावांचा बचाव करताना त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि बांगलादेशच्या फॉर्मात नसलेल्या संघावर वर्चस्व गाजविण्याची आशा ते बाळगून असतील. बांगलादेशला यावर्षी ‘टी-20’मध्ये संघर्ष करावा लागलेला आहे. श्रीलंका आणि अमेरिकेविऊद्धच्या मालिकांत त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवाय सराव सामन्यातही भारताकडून पराभूत व्हावे लागले.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article