For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंड कसोटीसाठी लंका संघ जाहीर,

06:13 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंड कसोटीसाठी लंका संघ जाहीर
Advertisement

फर्नांडोचे पुनरागमन, मदुश्काला डच्चू

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटींच्या मालिकेसाठी लंकेने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात निशान मदुश्काला वगळण्यात आले आहे तर ओशादा फर्नांडोचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेतील पहिली कसोटी बुधवारपासून सुरू होत आहे.

Advertisement

18 महिन्यांच्या खंडानंतर ओशादाचे संघात परतला आहे. लंकेचा अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या मालिकेत चमकदार प्रदर्शन केल्यामुळे सलामीवीर ओशादाला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. तेथे झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत ओशादाने 122 व 80 धावांची खेळी केल्या आणि लंका अ संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मदुश्काला त्याच्यासाठी संघाबाहेर करण्यात आले आले. मदुश्काची अलीकडील नीरस कामगिरीही याला कारणीभूत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत मदुश्काने 4, 0, 7, 13 अशा धावा जमविल्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्याला वगळण्यात आले होते. ओशादाला संघात स्थान मिळाले असले तरी त्याला अंतिम अकरा संघात स्थान मिळविणे कठीण जाणार आहे.

दिमुथ करुणारत्ने, निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्वा, कमिंदू मेंडिस हे अंतिम संघात आपले स्थान राखण्याची अपेक्षा आहे. आठव्या क्रमांकावर रमेश मेंडिसला स्थान मिळण्याची जास्त शक्यता आहे. उर्वरित तीन जागांवर स्पिनर प्रभात जयसूर्या, दोन सीमर्सना निवडले जाईल. दोन्ही कसोटी गॅलेमध्ये होणार असून दुसरी कसोटी 26 सप्टेंबरपासून सुरू होईल. कसोटीसाठी निवडण्यात आलेला लंका संघ : धनंजय डिसिल्वा (कर्णधार), करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस, मॅथ्यूज, चंडिमल, कमिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, ओशादा फर्नांडो, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरु कुमारा, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री व्हान्डरसे, मिलन रत्नायके.

Advertisement
Tags :

.