For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेने चीनला दिला झटका हेरनौकांना प्रवेश देण्यास दिला नकार

06:01 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेने चीनला दिला झटका हेरनौकांना प्रवेश देण्यास दिला नकार
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

श्रीलंका स्वत:च्या सागरी क्षेत्रात विदेशी जहाजांना येण्याची अनुमती देणार असल्याचे वृत्त त्या देशाचे विदेशमंत्री अली साबरी यांनी फेटाळले आहे. श्रीलंकेने स्वत:च्या जलक्षेत्र आणि विशेष आर्थिक क्षेत्रात सर्वेक्षणासाठी विदेशी संशोधन नौकांवरील  बंदी हटविण्याचा निर्णय घेतलेला नाही असे साबरी यांनी स्पष्ट केले आहे.

श्रीलंका लवकरच सागरी जलक्षेत्रात विदेशी जहाजांच्या सर्वेक्षणावर असलेली बंदी हटविणार असे वृत्त जपानच्या प्रसारमाध्यमांनी दिले होते. या वृत्तामुळे भारताची चिंता वाढली होती, कारण यामुळे चिनी हेरनौकांना भारतीय किनाऱ्यानजीक येण्याची संधी मिळाली असती.

Advertisement

टोकियो येथे एका मुलाखतीत दिलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ सादर करण्यात आला. चालू वर्षापर्यंत आमच्या देशाच्या सागरी क्षेत्रात विदेशी संशोधन नौकांच्या प्रवेशावर बंदी आहे. आम्ही चालू वर्षाच्या अखेरीस स्थितीचे आकलन करून विदेशी संशोधन नौकांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल निर्णय घेणार आहेत. हा निर्णय तत्कालीन स्थितीवर निर्भर असणार आहे. सध्या सरकारने ही बंदी हटविण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असे साबरी यांनी स्पष्ट केले.

आम्ही एक राष्ट्र म्हणून क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी केंद्र ठरण्याची इच्छा बाळगून आहोत.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारांतर्गत सागरी जहाजांच्या वाहतुकीवरून वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे नियम आम्ही लागू करू शकत नाही. अशा स्थितीत चीनसाठी देखील अन्य देशांप्रमाणेच समान संधी असणार आहे असे श्रीलंकेच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेचे विदेशमंत्री साबरी अलिकडेच जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यादरम्यान त्यांनी जपानचे प्रसारमाध्यम एनएचके वर्ल्डला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी श्रीलंकेच्या सरकारने स्वत:च्या जलक्षेत्रात संशोधनासाठी येणाऱ्या विदेशी जहाजांवरील बंदी संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले होते. परंतु आता त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे.

Advertisement

.