For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणात आज रात्री श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा

05:33 PM Oct 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवणात आज रात्री श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा
Advertisement

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्या वतीने भरड नाका येथे आयोजन

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्यावतीने आज रविवार १९ ऑक्टोबर रोजी मालवण शहर भरड नाका येथे रात्री ९ वाजता 'भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक स्टेज मांडणी, एलईडी स्क्रीन अश्या भव्यदिव्यतेत बहुसंख्य स्पर्धकांच्या सहभागातून ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने संयोजक प्रशांत हिंदळेकर व सह संयोजक भाऊ सामंत यांनी केले आहे.
जयजयकार श्रीकृष्णाचा, वध नरकासुराचा हे ब्रीद घेऊन या स्पर्धेचे यावर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा तीन गटात होत आहे. यात लहान गट - बालवाडी ते चौथी- अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, उत्तेजनार्थ दोन- ५०० रुपये, खुला गट - पुरुष- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये, खुला गट - महिला- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धकांना श्रीकृष्ण-वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. त्यासोबत राधा पात्र असले तरीही चालेल. तसे नसले तरीही स्पर्धक एकट्याने सादरीकरण करू शकतो. वेशभूषा, साहित्य आणि सादरीकरणाची तयारी स्पर्धकांनी स्वतःहून करायची आहे. स्पर्धेत अजून काही नियम असल्यास स्पर्धेच्या ठिकाणी ते सांगण्यात येतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. स्पर्धेत मालवण सह जिल्ह्यातून उत्स्फूर्त पणे नाव नोंदणी होत आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अमित खोत- ९४०४४५७७८८ किंवा गणेश मेस्त्री ९४०४९१६८६९ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.