महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेंगळूरचा हैदराबादवर दणदणीत विजय

09:34 PM May 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विराट कोहलीचे दमदार शतक, डु प्लेसिसचे अर्धशतक, हैदराबादच्या क्लासेनचे शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

Advertisement

2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या 65 व्या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने यजमान सनरायजर्स हैदराबादचा 4 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी पराभव केला. बेंगळूरने 19.2 षटकात 2 बाद 187 धावा जमविल्या. तत्पूर्वी सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 5 बाद 186 धावा जमविल्या होत्या. हैदराबादच्या डावात क्लासेनने शानदार शतक झळकविले (104) तर बेंगळूरच्या डावात विराट कोहलीने शानदार शतक नोंदविले (100). कोहलीने 2023 च्या आयपीएल हंगामात आपले पहिले शतक झळकविले. तसेच त्याने आयपीएलच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 6 शतकांची नोंद करीत विंडीजच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. चालू वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत शतक नोंदविणारा कोहली आठवा फलंदाज आहे. या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 गुणासह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादने 8 गुणासह शेवटचे स्थान मिळवले. विराट कोहली आणि कर्णधार डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीला प्रारंभ केला. या जोडीने

पॉवरप्लेमधील 6 षटकात 64 धावा झोडपल्या. बेंगळूरचे पहिले अर्धशतक 26 चेंडूत फलकावर लागले. कर्णधार डु प्लेसिसने 34 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. कोहली आणि डु प्लेसिस यांनी सलामीच्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 68 चेंडूत नोंदविली. त्यानंतर कोहलीने आपले अर्धशतक 35 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने दीड शतकी भागिदारी 91 चेंडूत झळकवली. त्यामध्ये कोहलीचा वाटा 82 तर डु प्लेसिसचा वाटा 63 धावांचा होता. कोहलीने आपले शतक 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 62 चेंडूत नोंदविले. डावातील 18 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने कोहलीला फिलिप्सकरवी झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार डु प्लेसिस 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. नटराजनने त्याला त्रिपाठीकरवी झेलबाद केले. त्याने 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 71 धावा जमविल्या. मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना अनुक्रमे नाबाद 5 व नाबाद 4 धावा केल्या. बेंगळूरच्या डावात 7 अवांतर धावा मिळाल्या. बेंगळूरच्या डावामध्ये 6 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

क्लासेनचे शतक

तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 5 बाद 186 धावा जमवित रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात बेंगळूर संघाने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या सलामीच्या जोडीने 25 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. ब्रेसवेलने शर्माला झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्याने 14 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. यानंतर ब्रेसवेलने आपल्या याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्रिपाठीला तंबूचा रस्ता दाखविला. त्रिपाठीने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. हैदराबाद संघाने आपले हे सलामीचे दोन फलंदाज पाचव्या षटकात गमविले. हैदराबादने पॉवरप्लेच्या सहा षटकात 49 धावा जमविताना 2 गडी गमविले.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 5 बाद 186 (अभिषेक शर्मा 14 चेंडूत 11, राहुल त्रिपाठी 12 चेंडूत 15, मार्करम 20 चेंडूत 18, क्लासेन 51 चेंडूत 104, ब्रूक 19 चेंडूत नाबाद 27, फिलिप्स 4 चेंडूत 5, अवांतर 6, ब्रेसवेल 2-13, मोहम्मद सिराज 1-17, शाहबाज अहमद 1-38, हर्षल पटेल 1-37).

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : 19.2 षटकात 2 बाद 187 (विराट कोहली 63 चेंडूत 100, डु प्लेसिस 47 चेंडूत 71, मॅक्सवेल नाबाद 5, ब्रेसवेल नाबाद 4, अवांतर 7, भुवनेश्वर कुमार 1-48, टी. नटराजन 1-34).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article