For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धनुषच्या चित्रपटात श्रीलीलाची एंट्री

06:11 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
धनुषच्या चित्रपटात श्रीलीलाची एंट्री
Advertisement

मागील वर्षी ‘तेरे इश्क में’सारखा यशस्वी चित्रपट देणारा दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या आगामी चित्रपटाची घोषणा अलिकडेच झाली असून याला सध्या ‘धनुष 55’ हे नाव देण्यात आले आहे. धनुषच्या अभिनयाच्या कारकीर्दीतील या 55 व्या चित्रपटाला आता मुख्य नायिका मिळाली आहे.

Advertisement

अभिनेता धनुषची फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेत नव्हे तर आता पूर्ण भारतात पसरली आहे. त्याच्या चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुकअ सतात. याचदरम्यान धनुषच्या आगामी चित्रपटावरून निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटात श्रीलीला ही मुख्य नायिका म्हणून दिसून येणार आहे. निर्मात्यांनी धनुष आणि श्रीलीलाची छायाचित्रे शेअर करत ही माहिती उघड केली आहे. धनुष आणि श्रीलीला ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बाब ठरणार आहे.  श्रीलीलाला सर्वाधिक लोकप्रियता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पुष्पा 2’मुळे मिळाली आहे. या चित्रपटात श्रीलीलाचा एक आयटम साँग होता. या गाण्यावर श्रीलीलाने केलेल्या नृत्याचे सर्वांनी कौतुक केले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.