For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीजेशच्या योगदानाचा पंतप्रधान मोदींच्या पत्रातून गौरव

06:22 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीजेशच्या योगदानाचा पंतप्रधान मोदींच्या पत्रातून गौरव
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

निवृत्त भारतीय हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेले एक पत्र जगासमोर आणले आहे, ज्यामध्ये माजी गोलरक्षकाच्या खेळातील योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे आणि नवीन राष्ट्रीय कनिष्ठ प्रशिक्षक म्हणून त्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

श्रीजेशने भारताच्या कांस्यपदक विजेत्या पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेनंतर आपल्या 15 वर्षांच्या शानदार कारकिर्दीला संपविणे पसंत केले होते. टोकियोमधील कांस्यपदकानंतर त्याचे आणि संघाचे ते ऑलिम्पिकमधील सलग दुसरे पदक होते. गोलपोस्टसमोरील कौशल्यासाठी ‘दि वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीजेशने दोन आशियाई क्रीडास्पर्धांतील सुवर्णपदके आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफीतील रौप्यपदके यासह संघाला उल्लेखनीय यश मिळवून देण्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निवृत्तीनंतर हॉकी इंडियाने श्रीजेशची कनिष्ठ पुऊष संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्याने भारताला हॉकीमधील ‘पॉवरहाऊस’ बनविण्याची प्रतिज्ञान केली आहे.

Advertisement

कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीजेशच्या प्रभावाबद्दल पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, नवीन भूमिकेत तुझे काम तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी राहील याची मला खात्री आहे. खेळातील कारकीर्द संपुष्टात आणत असताना मी भारतीय हॉकीमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तुझे मनापासून कौतुक करू इच्छितो, असे मोदींनी 16 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मोदींच्या पाठिंब्याबद्दल श्रीजेशने त्यांचे आभार मानले आहेत.

‘हे हृदयस्पर्शी पत्र माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाले. हॉकी हे माझे जीवन आहे आणि मी या खेळाची सेवा करत राहीन आणि हॉकीमध्ये भारताला एक शक्ती बनवण्याच्या दिशेने काम करत राहीन. याची सुऊवात 2020 व 2024 मधील ऑलिम्पिक पदकांपासून करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार’, असे श्रीजेशने नरेंद्र मोदी यांचे पत्र शेअर करताना लिहिले आहे.

Advertisement
Tags :

.