For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांजराच्या आकाराइतकी खार

06:22 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मांजराच्या आकाराइतकी खार
Advertisement

20 फूटांपर्यंत मारू शकते उडी

Advertisement

तुम्ही कधी मांजराच्या आकाराइतकी खार पाहिली आहे का? भारतातच अशाप्रकारची खार तुम्हाला दिसून येईल. भारतीय विशाल खारला मालाबार विशाल खार या नावानेही ओळखले जाते. भारताच्या जंगलांमध्ये आढळणारा हा रंगबिरंगी जीव स्वत:च्या झाडीदार शेपटासह 3 फूट लांब असू शकतो. करड्या, जांभळ्या आणि नारिंगी रंगाचे फर पाहून हा प्राणी एखाद्या परीकथेतून आल्याचे वाटते.

लांब अंतरापर्यंत उडी घेण्याची याची क्षमता आणि याचा विविध आहार याच्या अनुकुलन क्षमतेला दर्शवितात. स्वत:चे सौंदर्य आणि महत्त्वानंतरही भारतीय विशाल खारीला अधिवासाचे नुकसान आणि वनांच्या कत्तलीमुळे धोका निर्माण झाला आहे. या आकर्षक प्राण्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न आवश्यक ठरले आहेत.

Advertisement

झाडांवरील सर्वात मोठ्या खारीपैकी एक म्हणून मलबार खारीला ओळखले जाते. हा प्राणी स्वत:चे बहुतांश जीवन झाडांवरच व्यतित करतो, फारच कमी वेळा हा प्राणी जमिनीवर उतरतो. त्याच्या आहारात मुख्यत्वे फळ, मेवा, फूल आणि झाडांची साल सामील असते. ते पाने आणि फांद्यांद्वारे मोठे, गोलाकार घरटे तयार करतात.

भारतीय विशाल खारीने स्वत:च्या वन अधिवासात  टिकून राहण्यासाठी अत्यंत अनोखे वर्तन विकसित केले आहे. हेच वैशिष्ट्या या प्राण्याला जंगलात जिवंत राहणे आणि स्वत:ची संख्या वाढविण्यास मदत करते. त्यांच्याकडे मजबूत, तीव्र पंजे असतात, ज्यामुळे ते झाडांवर सहजपणे चढू शकतात. त्यांची लांब, झाडीदार शेपटी त्यांना झाडांच्या शेंड्यावर चलतान संतुलन कायम राखण्यास मदत करते.

या प्राण्यात गंधाची तीव्र भावना असते, जी त्यांना भोजन शोधण्यास मदत करते. त्यांचे मोठे कान वेगवेगळ्या दिशांमधून येणाऱ्या आवाजांना ओळखण्यासाठी फिरु शकतात. हा प्राणी परस्परांशी अनेक प्रकारचे आवाज आणि शेपटाच्या हालचालींद्वारे संवाद साधत असतो. गरज भासल्यास हा प्राणी पाण्यात पोहू शकतो. परंतु हा प्राणी झाडांवरच राहणे पसंत करतो.

भारतीय विशाल खार एकांतप्रिय प्राणी आहे. हा प्राणी झाडांच्या फांद्यांवर उन्हाचा आनंद घेण्यासाठी ओळखला जातो. उष्णता शोषून घेण्यासाठी हा प्राणी स्वत:चे अवयव फैलावतो, तसेच तो स्वत:च्या अविश्वसनीय उडी घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. झाडांदरम्यान तो 20 फूटांपर्यंत झेपावू शकतो. हा प्राणी स्वत:च्या पंज्यांचा वापर करून शरीराची स्वच्छता करत असतो. त्याचा चमकणारा रंग त्यांना जंगलात सुरक्षित राहण्यास मदत करतो. हा प्राणी 20 वर्षांपर्यंत जगु शकतो.

Advertisement
Tags :

.