‘स्क्विड गेम’ फेम वी हाजुन ‘साइरंस किस’मध्ये दिसणार
रोमँटिक- थ्रिलर कोरियन सीरिज
सध्या भारतीय प्रेक्षक कोरियन सीरिज मोठ्या संख्येत पाहत आहेत. अशा स्थितीत अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कोरियन सीरिज स्ट्रीम होत असतात. लवकरच एक सीरिज ‘साइरंस किस’ही प्रेक्षक पाहू शकतील. यात स्क्विड गेम फेम वी हाजुन दिसून येणार आहे. साइरंस किस सीरिजमध्ये ‘कॉन्फिडेन्स क्वीन’ फेम पार्क मिनयंग देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. सीरिजमध्ये ध्यास अन् फसवणुकीची कहाणी असणार आहे. ही एक रोमँटिक, थ्रिलर धाटणीची सीरिज असून यात एक इंशोरेन्स फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन युनिटच्या कुशाग्र इन्व्हेस्टिगेटरची भूमिका वी हाजुनने साकारली आहे. एका तपासादरम्यान त्याला एका युवतीवर संशय येतो. या युवतीची भूमिका पार्क मिनयंगने साकारली आहे. ‘साइरंस किस’ या सीरिजचे दिग्दर्शन किम चेओलग्यूने केले आहे. किमने यापूर्वी फ्लॉवर ऑफ एविल, सेलिब्रिटी, शिकागो टाइपरायटर आणि मदर यासारख्या सीरिज दिग्दर्शित केल्या आहेत. यावेळी तो रोमान्ससोबत थ्रिलर धाटणीच्या कहाणीकरता कौशल्य दाखवून देणार आहे. ही कोरियन सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 2 मार्चपासून स्ट्रीम होणार आहे.