For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्क्वॅश : भारतीय महिलांचा दुसरा विजय

06:29 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्क्वॅश   भारतीय महिलांचा दुसरा विजय
Advertisement

जपानवर मात, पुरुष संघाने चीनला हरविले

Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

भारताच्या महिला स्क्वॅश संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनविरुद्ध विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या लढतीत यजमान जपानवर 2-1 अशा फरकाने मात केली. त्याआधी त्यांनी चीनला 2-1 असे हरविले होते. पुरुष स्क्वॅश संघाने ‘अ‘ गटात चीनवर 3-0 असा सहज विजय मिळवत आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेची शानदार सुरुवात केली.

Advertisement

भारताच्या सूरज चंद, वीर चोत्रानी आणि वेलावन सेंथिलकुमार या सर्वांनी सहज विजय नोंदवून सरळ गेम्समध्येच सामना जिंकला. चंदने डू शाओकियानला 30 मिनिटांत 11-4, 11-3, 12-10 असे हरवले. त्यानंतर चोत्रानीने 11-5, 11-5, 11-3 असा दणदणीत विजय मिळवून भारताची आघाडी वाढवली. 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात यू हायझेनवर विजय मिळवला. सेंथिलकुमारने झोऊ पेंग्लिनचा 11-3, 11-2, 11-4 असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय पूर्ण केला.

दरम्यान, समीना रियाझने झियुआन यिनविरुद्ध दोन गेमची आघाडी गमावल्यानंतर महिला संघाला मोठी झुंज द्यावी लागली. समीना रियाझने पहिले दोन गेम जिंकले, पण सामना संपवू शकली नाही आणि 41 मिनिटांच्या खडतर लढतीत तिला 11-8, 11-6, 9-11, 9-11, 12-14 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तन्वी खन्नाने अवघ्या 17 मिनिटांत झांग युनिंगवर 11-3, 11-5, 11-5 असा एकतर्फी विजय मिळवून भारतासाठी बरोबरी साधली. अनुभवी जोश्ना चिनप्पाने आपल्या अनुभवाच्या जोरावर लिऊ झीयीवर 22 मिनिटांत 12-10, 11-4, 11-6 अशी मात करून भारतासाठी 2-1 असा विजय निश्चित केला.

Advertisement
Tags :

.