स्क्वॅश : भारतीय पुरुष आणि महिलांचे पदक निश्चित
06:30 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
भारतीय पुरुष आणि महिला संघाने अनुक्रमे कुवेत आणि सिंगापूरवर दणदणीत विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला असून, आपले पदक निश्चित केले आहे. भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत कुवेतवर 2-0 असा विजय मिळवला. या सामन्यात त्याने 12-10, 8-11, 11-0, 11-5 असा विजय मिळवला.एकेरी स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अभय सिंगने अम्मार अल्तामिमीवर 11-3, 11-4, 11-8 असा विजय मिळवून सामना आपल्या नावावर केला.महिला एकेरीमध्ये, अनाहत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरवर 2-0 ने विजय मिळवला. अवघ्या 32 मिनिटांच्या रोमांचक सलामीच्या एकेरी सामन्यात ऑ येओंग वाई लिनवर 11-6, 4-11, 15-13, 11-1 असा निसटता विजय मिळवला. महिला संघ गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत हाँगकाँगचा सामना करेल, तर पुरुष संघ मलेशियाशी सामना करेल.
Advertisement
Advertisement