'सीडबॉल'च्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचा 'रुजवा'
दापोली / मनोज पवार :
सध्याची लहान पिढी ही आत्ममग्न होत आहे. अशी पालकांची ओरड होत असताना जिल्हा परिषद शाळेच्या विवाव्यांनी १ हजार सीडबॉलच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपली आहे. मोबाईल मग्न पिठीच्या या सामाजिक जाणीवेच्चा 'रुजवा नुकताच जालगाववासियांना अनुभवायला मिळाला. वेषील वनराई वाढवण्यासाठी पाचवी ते सातवीच्या विद्याव्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.
जालगाव आदर्श केंद्र शाळा क्र.१. जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडी, बौद्धवाडी व सुतारकोंड येथील ५ वी, ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल महिन्यातच १,००० सीडबॉल शाळेतच तयार करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या कालावधीत अभ्यास सांभाळून या विद्यार्थ्यांनी २ दिवस खपून माती, शेणखत, कंपोस्ट खत, पालापाचोळा याच्या माध्यमातून तब्बल १ हजार सीडबॉल तयार केले. यासाठी त्यांना पालक, शिक्षक, ग्रामस्व व ग्रा. पं. सदस्यांची मदत झाली.
या सीडबॉलमध्ये रिंगी, शिकाकाई, काजू, हरडा, बेहरा, बकुळ, आंबा, चिकू, चिंच, बोर, जाम इत्यादी परिसरात मिळणाऱ्या फळांच्या बिया गोळा करून त्यांचा सीडबॉलमध्ये 'रुजवा' करण्यात आला. यानंतर हे सीडबॉल सुकवण्यात आले व पावसाळ्यात लागवड करण्यासाठी ठेवून देण्यात आले.
- सीडबॉलने अधिकाधिक वनराई निर्माण होईल
गुरुवार ३ जुलै रोजी हे सर्व सीडयौत पिशव्यांमध्ये भरून या सर्व विद्यार्थ्यांनी जालगाय येथील ओगसाईनगर, सुतारकोंड, श्रीरामनगर येथील जंगलांमध्ये नेऊन टाकले. जंगलात जाऊन प्रत्यक्ष खड्डा फरून झाडं लावण्यापेक्षा सीडबॉलच्या माध्यमातून अधिक बांगला निकाल मिळेल व अधिकायिक वनराई निर्माण होईल, असा विद्यार्थ्यांना विश्वास आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका स्नेहा बर्वे, रामचंद्र चौगुले, गणेश पवार यांसह सरपंच अक्षय फाटक, उपसरपंच स्वप्निल भाटकर तसेच सदस्य प्रतिभा दांडेकर, चारुता आठले, समृद्धी जाधव, हर्षाली तांबे, मृणाल लिंगावले, शर्वरी धोपट,वैभव कोळंबेकर, जयदीप पालकर, माजी वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, माजी सदस्य शिरीष देसाई यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभले.
- सीटबॉल म्हणजे काय?
ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करणे शक्य नसते, अशा ठिकाणी सीडयोंतचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. सीडबॉल म्हणजे माती, शेणखत कंपोस्ट खत, पालापाचोळा यांच्यापासून बनवलेले मातीचे गोळे अत्ततात. या मातीच्या गोळ्यामध्ये उन्हाळ्यातच बिया टाकून तेवायच्या असतात. यानंतर है मातीचे गोळे सुकवण्यात वेतात व पावसाळा सुरू झाल्यावर जेथे वनराई निर्माण करायची आहे, तेथे उचायरून टाकण्यात येतात. यामुळे जेथे प्रत्यक्ष जाऊन स्यष्का करून वृक्षारोपण करणे शक्य नसते तेथेही विनासायास वनराई वाढवण्यास मदत होते. शिवाय कमी वेळात अधिक प्रमाणात विविध बियांचा रुजवाही करणे शक्य होते.