For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णी ग्रा. पं.तर्फे औषध फवारणीला सुरुवात

10:28 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णी ग्रा  पं तर्फे औषध फवारणीला सुरुवात
Advertisement

डेंग्यू रोगराईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न, अन्य ग्रामपंचायतींनीही उपक्रम राबविण्याची गरज

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्यात डेंग्यू व चिकुन गुनिया रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. तसेच प्रत्येक ग्राम पंचायतीमार्फत डेंग्यू नियंत्रण आणण्यासाठी गटारींची साफसफाई व औषध फवारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार बिजगर्णी ग्राम पंचायतीने आपल्या ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात औषधाची फवारणी सुरू केली आहे. पश्चिम भागातील अन्य ग्राम पंचायतीने हा उपक्रम सुरू करण्याची गरज आहे.

Advertisement

गटारींमध्ये साचलेले सांडपाणी, घरांच्या आजूबाजूला ठेवण्यात आलेल्या बादल्या, पडलेल्या प्लास्टिक बॉटल्स, टायर आदींमध्ये पाणी साचून राहते. यामध्ये डासांची उत्पती अधिक प्रमाणात होते. त्यामुळे याची साफसफाई करण्यात यावी, तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, अशी जनजागृती सध्या करण्यात येत आहे. यासाठी बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर व पीडीओ रविकांत यांनी केले आहे.

बिजगर्णी ग्राम पंचायतीच्यावतीने राकसकोप,यळेबैल व बिजगर्णी या तिन्ही गावातील गटारी व गटारींच्या आजूबाजूला औषधाची फवारणी केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कावळेवाडी गावात मंगळवारी औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. या औषध फवारणीमुळे डासांचा मृत्यू होतो, तसेच डासांची उत्पत्तीही कमी होते. यामुळे अन्य गावातही या औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून सदर औषध फवारणीसाठी देण्यात आले नसेल तरीही ग्रा.पं.ने पंचायत निधीमधून औषध आणून औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Tags :

.