क्रीडा शिक्षक अजय शिंदे 'क्रीडादूत' उपाधीने सन्मानित
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केला सन्मान
मालवण । प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यामध्ये सलग 25 वर्षे क्रीडा समन्वयक हे पद यशस्वी सांभाळणारे श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉक्टर श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री अजय मालती मधुकर शिंदे यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभहस्ते क्रीडा दूत या उपाधीने सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस ,क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, लिपिक श्री सुरेकर व सर्व तालुक्यांचे समन्वयक नंदकिशोर नाईक, विजय मयेकर, हनुमान सावंत, संजय परब ,बयाजी बुरान, उत्तरेश्वर लाड हे क्रीडा समन्वयक उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात तालुका क्रीडा समन्वयक म्हणून सन 2001 पासून आज पर्यंत 25 वर्षे क्रीडा क्षेत्रात समन्वयक म्हणून भरीव कार्याबद्दल आणि जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल क्रीडा दूत या पुरस्काराने सन्मानित करत असताना श्री अजय शिंदे यांनी अनेक वर्षापासून क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाशिक्षक खेळाडू यांना मार्गदर्शन करून क्रीडा व शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.श्री अजय शिंदे यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे...क्रीडा क्षेत्रातील समर्पण ,मेहनत या योगदाना बद्दल सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने क्रीडा दूत हा सन्मान प्रदान करत असताना अत्यंत आनंद होत आहे असे उद्गार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील यांनी काढले.. श्री अजय शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तालुक्यातील क्रीडा संस्कृती समृद्ध झाली असून ,भविष्यातही असेच कार्य सुरू ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहावे अशी आशा जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी व्यक्त केली..
श्री अजय शिंदे हे क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ या रजिस्टर मान्यताप्राप्त एकमेव संघटनेचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर विभागाचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य संघटक म्हणून काम पाहत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजिस्टर बास्केटबॉल ,सॉफ्ट बॉल, बेसबॉल, नेट बाॅल ,सायकलींग, बॅडमिंटन, स्विमिंग ,लगोरी, पेट्यांक्यु & बावले अशा विविध संघटनांवर पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये 89 वर्षे पुरोगामी विचारसरणीने चालणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ (फेडरेशन) या संघटनेशी संलग्न असलेली सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ या शिक्षकांचे प्रश्न सोडवणार्या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.श्री शिंदे यांना मिळालेल्या क्रीडा दूत या पुरस्कारामुळे जील्हाभरातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन चे अध्यक्ष विलास झाड, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, खजिनदार विनायक निवेकर, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, या सर्वांनी अभिनंदन केले आहे.