महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्वकर्मा योजनेला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

12:28 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : देशातील युवक केवळ नोकरीवर अवलंबून न रहाता त्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुऊ करण्यात आली असून या योजनेला गोव्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे दीड लाख कारागीर असून, या सर्वांना केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठीची जनजागृती विविध माध्यमांतून राज्यभरात करण्यात येत आहे. त्यामुळेच योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी दिली आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत राज्यातील 3 हजार 886 कारागिरांनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. 15 नोव्हेंबरला 889 कारागिरांची पोर्टलवर नोंदणी होती. मात्र 24 नोव्हेंबरपर्यंत हा आकडा 4 हजार 775 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत उत्तर गोव्यातून 3 हजार 169 आणि दक्षिण गोव्यातून 1 हजार 606 अशी मिळून 4 हजार 774 जणांनी योजनेसाठी अर्ज केलेले असून, 1 हजार 123 जणांच्या अर्जांना प्राथमिक पातळीवर मंजुरीही मिळालेली आहे.

Advertisement

देशभरातून आतापर्यंत या योजनेसाठी लाखो पारंपरिक व्यावसायिकांची नोंदणी झालेली आहे. त्यात 24 नोव्हेंबरपर्यंत गोव्यातील 4 हजार 775 जणांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत राज्यातील 18 प्रकारच्या व्यावसायिकांना फायदा मिळणार आहे. पारंपरिक व्यावसायिकांनी पोर्टलवरील नोंदणी केल्यानंतर त्यांना 15 हजारांचे टूलकिट (अवजारांचा संच) मोफत देण्यात येईल. व्यवसायासाठी सुऊवातीला एक लाख, नंतर दोन लाखांचे कर्ज तसेच मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. गोव्यासह देशभरातील पारंपरिक व्यावसायिकांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना चालीस लावली आहे. या योजनेमुळे गोव्यातील पारंपरिक व्यवसायांना पुन्हा उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने राज्य देखरेख समिती तसेच दोन्ही जिह्यांत अंमलबजावणी समित्यांचीही स्थापना केलेली आहे. या समित्यांकडून राज्यभरातील पारंपरिक व्यावसायिकांमध्ये जागृतीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article