पोलीस दलाच्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
10:59 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : पोलीस दलाच्यावतीने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेली पाच व दहा किलोमीटरची मॅरेथॉन उत्साहात पार पडली. ‘सर्वांसाठी आरोग्य, नशामुक्त कर्नाटक व आमचे पोलीस आमचा अभिमान’ हा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस परेड ग्राऊंडवर रविवारी सकाळी आयर्न मॅन विजेते संगमेश आनी यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला चालना दिली. यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा व शहरातील पोलिसांबरोबरच मच्छे येथील राज्य राखीव दल, कंग्राळी खुर्द येथील पोलीस ट्रेनिंग स्कूल, एसडीआरएफ व नागरिकांनी भाग घेतला होता.
Advertisement
Advertisement