महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

06:21 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हजारो खटले काढले निकालात

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि. 13 रोजी बेळगावसह जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये भरविण्यात आली. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो खटले निकालात काढण्यात आले आहेत. याचबरोबर कोट्यावधी रुपयांची देव-घेवदेखील झाली आहे.

मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश त्यागराज यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रे•ाr यांनी लोकअदालतीचे आयोजन केले होते. कौटुंबिक न्यायालयामध्ये अनेक विभक्त झालेल्या पती-पत्नींना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दोन दाम्पत्यांचे पुन्हा मन जोडून त्यांना संसाराला लावण्यात आले आहे. याचबरोबर अनेकांना खटल्यांबाबत मार्गदर्शन करून त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

कौटुंबिक न्यायालयाबरोबरच इतर न्यायालयांमध्येही फौजदारी, दिवानी, बँक देव-घेव, विमा, नुकसानभरपाई संदर्भातील खटले निकालात काढण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील न्यायाधीशांनी कामकाज पाहिले. या लोकअदालतीला पक्षकारांबरोबरच वकिलांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article