चराठे येथे इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दुर्ग मावळा, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे आयोजन
ओटवणे : प्रतिनिधी
दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे शाळा नं. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रदर्शनामध्ये हत्यारे, नाणी, पुस्तके, छायाचित्रे सुंदर पद्धतीने मांडण्यात आली. इ. १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष हाताळायला देऊन त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी श्री. चिपकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास विविध प्रसंगातून मुलांसमोर सादर केला. सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अविस्मरणीय आठवणी व मौल्यवान वस्तु याबदद्ल देखील सविस्तर माहिती दिली. प्रशालेमध्ये हा स्तुत्य आणि आदर्शवत उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी आभार मानले.