सांगेलीत टेलिमेडिसिन क्लिनिकच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य
ओटवणे | प्रतिनिधी
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सांगेली आरोग्य केंद्रात रेमेडी टेलिमेडिसिन क्लिनिक आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँक संचालक तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगांवकर, टेलिमिडिसिन क्लिनिकचे डॉ. पटवर्धन, सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, भाजपा आंबोली मंडल युवा मोर्चाचे निलेश पास्ते, सांगेली शक्ती केंद्रप्रमुख गुरु राऊळ, सावरवाड बूथ प्रमुख महेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.टेलिमेडिसिन क्लिनिक ही संकल्पना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची होती. त्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टेलिमिडिसिन क्लिनिकची कंपनी यांच्यामार्फत हे सुविधा उपलब्ध केली होती. या शिबिरात स्त्री, बालरोग, त्वचा आदी आजारावरील रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य केंद्रामध्ये ज्या वैद्यकीय तपासण्या होत नाही त्या तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले