For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्कॉन आयोजित शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

06:00 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
इस्कॉन आयोजित शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
आतंरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या सावंतवाडी शाखेच्यावतीने भगवद्गीता आधारित आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी १० वी अशा दोन गटात घेतलेल्या या परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील २२ शाळां मधील एकूण २७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सावंतवाडी भटवाडी हरे कृष्णा सत्संग केंद्र येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगीसावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे सावंत भोसले, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पाटणकर गॅसचे रुजूल पाटणकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी राजन नाईक, इस्कॉन संस्थेचे राधा शरण प्रभुजी, रेडकर प्रभूजी, देवकी पुत्र प्रभुजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०००, २०००, १००० आणि ट्राॅफी, मेडल आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना स्कूल बॅग, कंपास, पॅड आदी बक्षिसे देण्यात आली. यावेळी युवराज लखमराजे सावंत भोसले, विक्रांत सावंत, रुजूल पाटणकर, राजन नाईक मान्यवरांनी इस्कॉन संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी विलासिनी माताजी यांनी इस्कॉन संस्थेविषयी सविस्तर माहिती देऊन या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची एक दिवसीय ट्रीप काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.भगवत गीता प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे इयत्ता ५ ते ७ वी गट प्रथम पद्मश्री विजय राऊळ (माडखोल शाळा नं १), द्वितीय मानस महादेव राऊळ, (सांगेली हायस्कूल), तृतीय अनुष्का उमेश गवळी (आंबेगाव शाळा नं १), इयत्ता ८ वी ते १० वी गट प्रथम विभागून रिधीमा रविकमल सावंत (सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल) आणि आत्माराम विजय राऊळ (माडखोल हायस्कूल), द्वितीय पारस देविदास दळवी (कलंबिस्त हायस्कूल), तृतीय भाविका दिलीप चव्हाण, (नवोदय विद्यालय सांगेली),
उत्तेजनार्थ प्रथम - मयुरी यशवंत गोसावी (आंबेगाव), निर्झरा सखाराम हुले (नवोदय विद्यालय), वैभवी विलास मोरजकर, प्रतीक प्रसाद गावडे (माडखोल धवडकी), रिया रमेश कोटकर (ओटवणे), गिरीजा मनीष राणे (सावंतवाडी आरपीडी हायस्कूल), नेहा केशव पेडणेकर (मळगाव), वैभवी विलास मोरजकर, द्वितीय - जय रामदास जंगले (आंबेगाव), पियुशा उत्तरेश्वर नेहरकर (नवोदय विद्यालय) जागृती प्रल्हाद राऊळ, विठ्ठल गजानन सावंत (दाणोली), नेहा ज्ञानेश्वर कोटकर (ओटवणे), शमिका राजेश केसरकर (कळसुलकर हायस्कूल), हर्षिता सहदेव राऊळ, तृतीय - वृषाली महेश जाधव, वेदिका बापू शेळके (नवोदय विद्यालय) समीक्षा निळकंठ गुरव, यश दाजी गवस (सातुळी), सुमंत दत्ताराम म्हापसेकर (ओटवणे शाळा नं.२), सोहम गुरुनाथ चितारी (कळसुलकर इंग्लिश स्कूल), आराध्य कृष्णकांत परब (कोलगाव शाळा नं २), जागृती प्रल्हाद राऊळ, वृषाली महेश जाधव, समिक्षा निळकंठ गुरव.हि स्पर्धा आयोजित करण्यासाठी कृष्णनाम प्रभुजी, (बीड) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या स्पर्धेची उत्तर प्रत्रिका तपासणी निवृत्त शिक्षक शैलैजा सावंत, शितल सावंत, हर्षद खडपकर आरोही खडपकर यांनी केली. या स्पर्धेचे नियोजन दिपक भराडी (देवकीपुत्र प्रभुजी), दिनेश सावंत (दयाल गोविंद प्रभूजी), तुषार सावंत, विजय राऊळ (वसु श्रेष्ठ दास), श्रीम. गोडसे, मनिषा वाडकर, राजेश वाडकर, ऐश्वर्या सावंत यांनी केले.या स्पर्धेसाठी डॉ. पावसकर, डॉ. चितारी, सुनिल मडगावकर, शैलेश पै, सुनील गावडे, चंदन भराडी, दिपक भराडी, ओशन मोटे, श्री शेडगे आणि स्व. प्रकाश रामजी गोवळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्मल प्रकाश गोवळकर यानी पारितोषिके पुरस्कृत केली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरी लीला माताजी यांनी, सूत्रसंचालन वसुश्रेष्ठदास यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश रेडकर प्रभूजी यांनी केले
केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.