For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेबीज लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

10:32 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेबीज लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

बेळगाव : पशुसंगोपन खाते आणि कर्नाटक पेट शॉप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक प्राणीजन्य रोग प्रतिबंधक दिनानिमित्त मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेला श्वान पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 500 श्वानांना प्रतिबंधक लस टोचली आहे.सरकारकडून 2030 पर्यंत रेबीज निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे.

Advertisement

शुक्रवारी झुनोटिक दिनानिमित्त उचगाव, आंबेवाडी, काकती, अनगोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्वानांना रेबीज लसीकरण करण्यात आले. याबरोबर जनावरांची आरोग्य तपासणी व जंतुनाशक औषधांचे वाटप केले.शहरात कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोका निर्माण होऊ लागला आहे. यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत सर्व श्वानापर्यंत लस पोहोचविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. नागरिकांनीही रेबीजचा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय डॉ. चंद्रशेखर धरप्पन्नगौडर, डॉ. दीपक यल्लिगार, डॉ. विश्वनाथ बंटी, डॉ. प्रताप हन्नुरकर यांनी प्रतिबंधक लस दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.