आमदार विठ्ठल हलगेकरांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या 63 व्या वाढदिनानिमित्त मंगळवारी शांतीनिकेतन शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएलई येळ्ळूर तसेच खानापूर तालुका प्राथमिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी जवळपास पाचशेच्यावर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश किडसन्नावर आणि केएलईचे डॉ. राजशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. शिबिरात बीपी, ब्लड शुगर चाचणी, हाडांची तपासणी यासह जनरल चेकअप, कान, घसा, नाक, चर्मरोग, लहान मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी, वृद्ध व लकवा इत्यादी उपचाराकरिता विविध डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. या शिबिरात तज्ञ डॉ. श्रीकांत रवरी, डॉ. मुर्गेश कुराणी, डॉ. स्फूर्ती मोरपन्नावर, डॉ. निर्मला शटर, डॉ. वाय. सुषमा, डॉ. गीतांजली तोडगी इत्यादी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.