मळगाव येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१५० रुग्णांची तपासणी : भाजप व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांचे आयोजन
न्हावेली / वार्ताहर
भारतीय जनता पार्टी मळगांव व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथील पेडणेकर सभागृह येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १५० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, भाजप शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, एस एस पी एम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश घोगळे, डॉ. योगेश केंद्रे, डॉ. संजय जोशी, डॉ. निलेश म्हेत्रे, लॅब असिस्टंट अमित लिंगवत, भाजपचे बुथ अध्यक्ष भगवान रेडकर, एकनाथ गावडे, एकनाथ खडपकर, रुपेश सावंत, सुखदेव राऊळ, प्रा. गणपत शिरोडकर , निलेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य निकिता राऊळ, प्रकाश जाधव, अनिषा जाधव आदी उपस्थित होते.या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी ,दंतरोग तपासणी , नेत्ररोग तपासणी ,अस्थिरोग तपासणी , स्त्रीरोग तपासणी तसेच लघवी तपासणी,रक्त तपासणी ,थायरॉईड तपासणी , शुगर तपासणी 'इसीजी तसेच कर्करोग चाचणी करण्यात आली.दरम्यान, नेत्र तपासणी केलेल्या रुग्णांसाठी तसेच अन्य नेत्र तपासणी इच्छुक असलेल्या रुग्णांसाठी रविवार ६ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेत्र तपासणीनंतर अत्यल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडीतील शुभांगी ऑप्टिक्सच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी माजी सभापती राजू परब तसेच सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली.