For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारवाड-पंढरपूर रेल्वेला उत्स्फूर्त प्रतिसाद

06:45 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
धारवाड पंढरपूर रेल्वेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

शेकडो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

आषाढी एकादशीच्या निमित्ताने बेळगावमधून शेकडो भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या धारवाड-पंढरपूर रेल्वेला तुफान प्रतिसाद मिळाला. याबरोबरच अन्य रेल्वेने मिरजमार्गे भाविक पंढरपूरला रवाना झाले. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

बेळगाव, खानापूर या भागातून गावागावातील दिंड्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्या पाठोपाठ इतर भाविकही खासगी वाहनांसह बस, रेल्वेने पंढरपूर गाठतात. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाता यावे यासाठी बुधवारपासून भाविक पंढरपूरला रवाना झाले. गुरुवारपासून धारवाड-पंढरपूर रेल्वे सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी तितकीशी माहिती नसल्याने प्रवाशांची संख्या मर्यादित होती. परंतु शुक्रवारी रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या बरोबरीनेच शुक्रवारी पहाटे चार वाचता दाखल झालेल्या बेंगळूर-पंढरपूर साप्ताहिक रेल्वेलाही बेळगावमध्ये गर्दी झाली होती. सुपरफास्ट एक्स्प्रेस असल्याने सकाळी 11 वाजता ती पंढरपूरला पोहोचली. या बरोबरच खासगी वाहनांनीही भाविक पंढरपूरला रवाना झाले.

Advertisement
Tags :

.