For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगावात श्रमदानातून स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

12:05 PM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माजगावात श्रमदानातून स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

सावंतवाडी पंचायत समितीचा पुढाकार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी माजगाव येथील माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या समाधी स्थळ आणि मुख्य रस्ता परिसरात राबविण्यात आलेल्या श्रमदानातून परिसर स्वच्छता या विशेष अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्वच्छता अभियानात पंचायत समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्वच्छता अभियाना अंतर्गत ​कै. भाईसाहेब सावंत यांच्या स्मृती जपणाऱ्या माजगाव येथील समाधी स्थळ आणि परिसरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता करण्यासह रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. सर्वांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर चकाचक केला. तसेच गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे परिसराने मोकळा श्वास घेतला. ​या उपक्रमाबद्दल माजगाव ग्रामपंचायतीने सावंतवाडी पंचायत समितीचे आभार मानून असून हा परिसर यापुढेही स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.या स्वच्छता अभियानात सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितू गावकर, माजी सभापती अशोक दळवी, माजगाव सरपंच रंजना कानसे, उपसरपंच रिचर्ड डिमेलो, माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे, ज्ञानेश्वर सावंत, श्याम कासार मंदार सावंत ओमकार सावंत आदीसह सावंतवाडी पंचायत समितीच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement
Tags :

.