सिंधुनगरी रिक्षा संघटनेच्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
३८ जणांनी केले रक्तदान
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघा मार्फत ओरोस फाटा येथे आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ३८ जणांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उदघाट्न शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मनीष कोल्हटकर ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी श्री सकपाळ व श्री पवार,सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय शारबिद्रे,सरचिटणीस सुधीर पराडकर,कोकण विभागाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, छोटू पारकर,रवी कदम,सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर,सचिव प्रवीण शिरसाट, उपाध्यक्ष अंकुश पारकर, खजिनदार सतीश सावंत,अनिल ओरोसकर आदी मान्यवरासह बहुसंख्य रिक्षा चालक मालक उपस्थित होते.
रिक्षा चालक मालक लोकांना नेहमीच चांगली सेवा देत असतात त्याच बरोबर त्यांनी रक्तदान शिबीरासारखा समाजिक उपक्रम आयोजित करून करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.असे उदगार उपस्थित सर्वच मान्यवरांनी काढले व रोजच्या धका धकीच्या जीवनात काम करणाऱ्या रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीरही आयोजित करावे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे सर्वांनी सागितले.