आचरा वरची चावडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा प्रतिनिधी
आचरा (वरची चावडी) येथील श्री बाळगोपाळ मंडळाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस तर दीप प्रज्वलन उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. आचराचे मालक सौरभ राणे यांच्या माध्यमातून रक्तदात्याना सेंद्रिय खत देवून महान अशा रक्तदान कार्याचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने राणे यांच्यासह रक्तपेढी विभागाचे आभार मानण्यात आले. यावेळी उद्योजक जयप्रकाश परूळेकर, अभय भोसले, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर, बबन शेट्ये, वामन आचरेकर, विजय लाड, उदय लाड, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, ओरोस येथील सर्व रक्त संक्रमण विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचर, मदतनीस यासह बाळगोपाळ मंडळाचे सर्व सभासद, महिला वर्ग उपस्थित होते. शिबिरात ३३ रक्तदात्यानी रक्तदान केले. कुलसुम नर्सरी नियोजनबद्ध आणि एकीच्या बळावर रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रक्तदात्यानी आयोजनकांचे आभार मानले.