महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

10:18 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रथमेश, सीमॉन, अरूण, रवींद्र, शुभांगी, दिया, बी. एच. विद्या, श्रेयश विविध गटात विजेते

Advertisement

बेळगाव : आपटेकर स्पोर्ट्स फौडेशन आयोजित बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेत प्रथमेश, सीमॉन, अरूण, रवींद्र, शुभांगी, दिया, बी. एच. विद्या, श्रेयश यांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, गोवा, महाराष्ट्र, आर्मी, सैनिक स्कूल सह विविध जिल्ह्यातील व विविध राज्यातील जवळपास 1 हजारहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. जिल्हा क्रीडांगणावर आपटेकर स्पोर्ट्स फैंडेशनतर्फे आपले शरीर सदृढ व निरोगी बनवावे, तरूण-तरूणी व्यसनापासून दूर जाणे, धावण्याचा नियमितपणे सराव या सर्व गोष्टींचे उद्दीष्ट समोर ठेवून बेळगाव रन 10 व 5 किलो मीटर त्याचप्रमाणे 3 कि.मी. व फन रन याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडांगणावर बेळगाव रन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी साऊथ वेस्टर्न रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर सत्यप्रकाश शास्त्राr, बेळगाव पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद, डॉ. रवी पाटील, डॉ. प्रसाद शरण, चरनजित सिंग, एन. निरंजन अर्स, प्रविण पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष किडसण्णावर, स्पर्धा सचिव मि. इंडिया सुनील आपटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून बेळगाव रन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

निकाल पुढीलप्रमाणे

10 किमी पुरूष विभागात 15 ते 30 वयोगटात 1) प्रथमेश परमारकर, 2) विजय सावरटकर, 3) बिंजोतो करीया, 4) भूषण गुरव, 5) भैरू नाईक, 6) साहील हुलदाल, 7) मोनुसिंग, 8) चैतन्य कोलकार, 9) गणेश पिरोजी, 10) सुशांत पाटील. 31 ते 45 वयोगटात 1) सीमॉन किपलगद, 2) राजु पिरण्णावर, 3) सुनील शिवानी, 4) राजकुमार मौर्य, 5) बाबु चौगुले, 6) मल्लाप्पा पुजेरी, 7) धरमराज शहापूरकर, 8) प्रतीक सावंत, 9) राघवेंद्र पाटील, 10) सोमनाथ हुद्दार. 46 ते 99 वयोगटात 1) अरूण तिपण्णावर, 2) कलाप्पा तिरवीर, 3) चंद्रकांत कडोलकर, 4) टी. तिरबाल, 5) जणेश नाईक, 6) वेंकटेश जवळी, 7) यशवंत परब, 8) अनिल गोडसे, 9) विनायक असुंडी, 10) दर्शन एन., 1) रविंद्र थोरात, 2) सुजीत येळ्ळूर, 3) अभिजीत सिंग, 4) देवांग चव्हाण, 5) अवनीश त्रिवेदी, 6) विघ्नेश पाटील, 7) समर्थ, 8) वरूण चौहान, 9) समर्थ नाडगेरी, 10) भावेश घाटे यांनी विजेतेपद पटकाविले.

महिला विभाग : 15 ते 30 वयोगटात 1) शुभांगी काकतकर, 2) धनश्री पाटील, 3) भूमी बेळगावकर, 4) दक्षता पाटील, 5) सानिका नाईक, 6) वैष्णवी चौगुले, 7) अनघा अनगोळकर, 8) सुमीता पाटील, 9) सह्याद्री राठोड, 10) वृशाली गोयल. 31 ते 45 वयोगटात 1)  दिया हेरेकर, 2) शिवानी अनगोळकर, 3) मिना गजरे, 4) वर्षा हुद्दार, 5) गार्गा काळे, 6) दिया होनगेकर, 7) श्रुतीका शिंदे, 8) वैशाली चौगुले, 9) अपूर्वा खानोलकर, 46 ते 99 वयोगटात 1) बी. एच. विद्या, 2) सविता शास्त्राr, 3) बी. एस. पार्वती., 1) श्रेया कोळेकर, 2) संध्या नाईक, 3) किमया गायकवाड. 4) आदीती कुंभारकोप, 5) इशा शिंदे, 6) देवयानी पाटील, 7) मुग्धा खटावकर, 8) नताशा पाटील, 9) पायल साळवी, 10) कृपा नाईक. यांनी विजेतेपद पटकाविले.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदके,  रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना संघटनेतर्फे टी-शर्ट व कॅप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत तरूण, वृध्द, महिला, पुरूष यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे दिव्यांग यांनी सुद्धा या स्पर्धेत आपला सहभाग दाखवून सर्व स्पर्धकांना धैर्य दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपटेकर स्पोर्ट्स फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article